एकाधिकारशाही काय असते हे खडसेंना लवकरच समजेल; ‘या’ भाजप नेत्याची खोचक टीका

मुंबई :

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना भाजपमधील लोकशाही संपून आता एकाधिकारशाही सुरु झाली असल्याची टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर ‘भाजपमध्ये एकाधिकारशाही नाही आणि कधीच नव्हती. एकाधिकारशाही काय असते हे खडसेंना लवकरच समजेल’, असे म्हणत भाजप नेते प्रसाद लाड यांनी खडसेंना टोला हाणला.

पुढे बोलताना लाड म्हणाले की, भाजपमध्ये एकाधिकारशाही नाही. हे खडसेंनाही माहीत आहे. त्यामुळे एकाधिकारशाही काय असते हे ज्या पक्षात जात आहेत, तिथे कळेलच. भाजपवर आरोप करण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन करावं. एखाद्याची स्वप्न जर त्याच्या इच्छेच्या पुढे जात असतील तर त्याला कोणीच आळा घालू शकत नाही.

नेमकं काय म्हणाले होते एकनाथ खडसे :-

आम्ही असताना पूर्वी बहुतांश निर्णय सामूहिक घेतले जायचे मात्र आता केवळ देवेंद्र फडणवीस  हे निर्णय घेतात आणि ते सर्व निर्णय पक्षावर लादले जातात.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here