डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर जहरी टीका; वाचा, काय म्हटलंय त्यांनी

दिल्ली :

जगात अमेरिकेची आणि देशात बिहारची निवडणूक विविध कारणांनी चर्चेत आहे. अमेरिकन निवडणुकीचे पडसाद देशांतर्गत विविध बाबींवर पडत असतात. आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाचे लोक विविध आश्वासने देत असतात. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी प्रचारादरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी “भारत हा विषारी हवा सोडणारा देश आहे” असं म्हणत भारतावर जहरी टीका केली आहे.

‘अमेरिका हा सर्वात कमी कार्बन उत्सर्जन करतो. त्या उलट चीन, भारत आणि रशिया आपल्या देशातील हवेच्या स्तराचा विचार करत नाही. या तीन देशांतील हवेचा स्तर अतिशय वाईट आहे’, असं म्हणत त्यांनी पर्यावरण बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्यावरून भारतावर निशाणा साधला.  

डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही पर्यावरणाच्या मुद्द्यावर विविध भूमिका घेतल्या होत्या. हवामान बदलाबाबत आजवर त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर नेहमीच टीका केली गेली आहे. अमेरिकेच्या या निवडणुकीच्या जगभरात परिणाम होत असतात. सोने, इंधन, शस्र तसेच व्यवसायापासून तर सत्तेपर्यंत अनेक गोष्टींवर ही निवडणूक परिणाम करणारी ठरत असते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here