मैत्रीवरील ही कविता नक्कीच वाचा; आवडली तर शेअर करायला विसरू नका

शाळेत असताना…
एक बाकावर सोबत जडलेली,

वर्गात असल्याने…
वर्षानुवर्षे संगतीने जोडलेली.

निरागस अन स्वच्छंदी बालपणाची ती मैत्री…

कॉलेजमध्ये असताना…
नव्या चेहेरयांमध्ये लपलेली,

कॉलेज कट्टा, कॅन्टीन मध्ये…
मजा मस्तीने रमलेली.

ती तारुण्यातली मैत्री…

चाळीत,बिल्डींगमध्ये राहत असताना…
ती बालपणाची खेळांमधून फुललेली,

दंगा मस्ती करताना…
हमारी – तुमरी वरून सच्चा दोस्त बनलेली.

ती कायमची ना विसरण्याजोगी मैत्री….

निरनिराळ्या पटलावर स्वार ….
हळू हळू फुलत जाणारी,

सुरुवात कुठून माहित नसणारी…
पण शेवट सोबत असणारी नानाविध

प्रकारे लक्षात राहणारी ती मैत्री.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here