शेलारांनी साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा; एकिकडे युवराज ‘त्या’ प्रेमाच्या गप्पा मारतात तर दुसरीकडे…

मुंबई :

‘एकिकडे युवराज पर्यावरण प्रेमाच्या गप्पा मारतात तर महापालिकेत मात्र झाडांच्या कत्तलीचे प्रस्ताव राजरोसपणे मंजूर केले जातात’, असे म्हणत भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या दोन महिन्यात 22 प्रस्तावातून 3 हजार 573 झाडांची कत्तल करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. ‘प्रस्ताव मंजूर करताना झाडांवरचे बेगडी प्रेम दिसेलच’, असा टोलाही पुढे बोलताना शेलार यांनी ठाकरेंना हाणला.

यापूर्वीही शेलार यांनी शिवसेनेच्या कंत्राट आणि टक्केवारी या विषयांवरून शिवसेनेवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, मुंबई पालिकेत भाजपचे संख्याबळ असताना विरोधीपक्ष नेते पद नाकारले. प्रभाग समितीची मत पत्रिका घेऊन पळाले. सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर ही स्थायी समितीमध्ये भालचंद्र शिरसाट यांचे सदस्त्व रद्द केले. मुंबईकर हो! तुमचे विषय गुंडाळून टेंडरच्या टक्केवारीसाठी डरपोकांची तानाशाही सुरु आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबईकरांची सेवा करणाऱ्या भाजपा नगरसेवकांचे कौतूक केले जात आहे. पण आम्हीच.. आमचीच..अशा वल्गना करणारे कुठे होते? सत्ताधारी तेव्हा नातेवाईकांना टेंडर वाटत होते बहुतेक!

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here