संजय राऊतांचा टोला; भाजपचा ‘हा’ प्रकार पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला छेद देणारा

मुंबई :

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच लस देण्याच्या मुद्द्यावरून भाजपला घेरलं जात आहे. अजून लस तयारच नाही तर तिचे आश्वासन कशाला देता? असा सवाल स्थानिक लोक करत आहेत. याच मुद्द्यावरून ‘ज्यांनी भाजपाला मतदान केले नाही त्यांना कोरोनाची लस मोफत मिळणार नाही का? यापूर्वी जातीधर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात होता, आता कोरोनाच्या नावाखाली देशात फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. जिथं निवडणूक तिथेच लस देणार का?’ असा सवाल शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना त्यांनी भाजपला टोलाही लगावला. ते म्हणाले की, भाजपाची विसंगती हा संशोधनाचा विषय आहे. तुम्ही मला व्होट द्या, आम्ही तुम्हाला लस देऊ, असा नवा नारा भाजपा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना घराघरात लस देणार असल्याचं सांगितलं पण भाजपाने बिहारच्या निवडणुकीत तेथील लोकांना मोफत लस देणार असल्याचं आश्वासन दिलं, त्यामुळे हा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला छेद देणारा आहे.  

दरम्यान स्थानिक लोकांमध्येही भाजपने दिलेल्या लसीबाबतच्या आश्वासनामुळे नाराजी आहे. इथे निवडणूक आहे म्हणून फक्त बिहारला लस देणार आणि इतर राज्यांचे काय?, असा सवाल जनसामान्यांयुन उपस्थित होत आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here