मिर्झापूर आणि मिर्झापूर 2 बाबत काही इंटरेस्टींग गोष्टी; नक्कीच घ्या जाणून

शहरीसह ग्रामीण भागात तरुणाईमध्ये प्रचंड प्रसिद्ध असलेल्या मिर्झापूर या वेबसीरीजचा दुसरा भाग आला आहे. या भागाची प्रेक्षक व चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ही सीरीज अ‍ॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध असून एका नवा रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज आहे. या सीझन २ च्या निमित्ताने या वेबसीरीजबाबतच्या काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१) गुड्डू पंडीतचे पात्र अनेकांना प्रेमात पडणारे होते. आली फजलने ती भूमिका उत्कृष्ठ पद्धतीने साकारली होती. आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की या वेबसीरीजमध्ये मुन्ना त्रिपाठीची भूमिका आधी अली फजलला ऑफर करण्यात आली होती. त्यासोबतच त्याची गुड्डू पंडीतच्या भूमिकेसाठीही टेस्ट करण्यात आली होती. अखेर निर्णय घेण्यात आला की, तो गुड्डूची भूमिका साकारणार.   

२) आपल्यापैकी अनेकांना त्रिपाठीच्या बंगल्याचे शुटींग कुठे झाले, हे जाणून घ्यायला आवडेल. ते शूटींग लोकेशन वाराणसी येथील मोती झील हवेलीमध्ये करण्यात आलं. अवघ्या १० दिवसांसाठी ही हवेली भाड्याने घेतली गेली आणि घरातील शॉटसचे शुटींग संपवले.

३)आपल्याला ही गोष्ट जाणून प्रचंड आश्चर्य वाटेल की, मिर्झापूरमध्ये कालीन भैयाची भूमिका साकारणाऱ्या पंकज त्रिपाठी यांनी तब्बल दीड वर्ष मिर्झापूर ही वेबसीरीज पाहिली नव्हती.

४) प्रॉडक्शन टीमने कालीन भैयाच्या धंद्यासाठी फेक अफीमचा वापर केला होता या सीझनमध्ये याला बर्फी म्हटलं गेलं आहे. टीमने अशाप्रकारची दोन अफीम तयार केले होते. यातील एक काळ्या मातीपासून तयार केलं तर दुसरं डार्क चॉकलेट आणि दुधापासून तयार केलं.

५) मुन्ना त्रिपाठीची भूमिका साकारणाऱ्या दिव्येंदु शर्माला आधी विक्रांत मेसीची भूमिका म्हणजे बबलू पंडीतची भूमिका ऑफर करण्यात आली होती. दिव्येंदुने सांगितले होते की, त्याला ही स्क्रीप्ट इतकी आवडली होती की, तो यात कोणतीही भूमिका साकारण्यास तयार होता. जेव्हा कास्ट फायनल झालं तेव्हा दिव्येंदुला मुन्ना त्रिपाठीची भूमिका मिळाली.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here