धक्कादायक : तर ‘त्या’ भागात ८ रिश्टरस्केलचा भूकंप येऊ शकतो; पहा काय म्हणतायेत संशोधक

आपल्याकडे नाशिक भागासह राजधानी दिल्ली आणि परिसरात मागील काही महिन्यात वेळोवेळी भूकंपाचे झटके बसले आहेत. त्याचवेळी आता एक महत्वाचे संशोधन हाती आलेले आहे. त्यात म्हटले आहे की, मागील १०० वर्षांमध्ये आलेला नसेल इतका मोठा भूकंप येऊ शकतो.

हा भूकंप हिमालयाच्या भागात येऊ शकतो. ज्याची तीव्रता तब्बल ८ रिश्टर स्केलपेक्षा जास्तही असू शकते. असे जर झाले तर मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होऊ शकते. कोलकाता येथेईल इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस एजुकेशन एंड रिसर्च (IISER) यांचे प्राध्यापक सीस्मोलॉजिस्ट सुप्रियो मित्रा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

फायनान्शियल एक्सप्रेस यांनी प्रसिद्ध केलेल्या बातमीत म्हटले आहे की, स्ट्रैटिग्राफिक एनालिसिस, स्ट्रक्चरल एनालिसिस, सॉयलिसिस आणि रेडियोकॉर्बन एनालिसिस यांच्या माध्यमाने संशोधकांनी ही शक्यता असल्याचे म्हटले आहे. पुढील शंभर वर्षांमध्ये कधीही ही नैसर्गिक आपत्ती येऊ शकते.

दिल्लीसह उत्तर भारतातील मोठ्या भूप्रदेशात यामुळे मोठे झटके बसतील. त्यासाठी आपल्याला सर्वांना आताच भूकंप विरोधक तंत्रज्ञानाचे घर बांधून घ्यावे लागणार आहे. नैसर्गिक ओढे आणि राहायला योग्य नसलेल्या जागांवर आपण जर घर आणि इतर बांधकाम केले तर ही जीवितहानी आणखीही जास्त वाढेल.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here