करोना लसीकरणावर होणार ‘इतका’ मोठा खर्च; पहा काय केलेय सरकारने नियोजन

बिहार निवडणुकीत भाजपची सत्ता देणारा कौल मिळाला तर सर्व बिहारी जनतेला मोफत करोना लस देण्याची घोषणा भाजपने केली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या या पक्षाने गरीब असलेल्या या राज्यात कोविड १९ आजारावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी संपूर्ण देशभरात करोना लसचे वितरण करण्यासाठीचे नियोजनही केले जात आहे.

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनने सर्वांना मोफत लस देण्याचे नियोजन केल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी भारतात ही लस सर्वांना मोफत मिळणार की त्यासाठी काही पैसे मोजावे लागणार यावर अजूनही निर्णय झालेला नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या सरकारने त्यासाठी ५०० अब्ज रुपये इतका निधी राखीव ठेवल्याची बातमी आली आहे.

ब्लूमबर्ग यांच्या बातमीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. १.३० अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतात प्रतिव्यक्ती ६ ते ७ डॉलर या हिशोबाने किमान ७ अब्ज डॉलर इतक्या रकमेचा खर्च करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. त्यातील २ डॉलर हे लस आणि त्याच्या वाहतुकीसाठी आणि इतर प्रशासकीय खर्च यासाठी वरील खर्च गृहीत धरण्यात आलेला आहे.

एकूणच लस कधी येणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यातच त्याच्या वितरणाचे आणि सर्वांना मोफत किंवा रास्त किमतीत लस देताना अजिबात भ्रष्टाचार किंवा काळाबाजार होणार नाही याची काळजी घेण्याचे मोठे आव्हान केंद्र आणि राज्य सरकार यांच्यावर राहणार आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here