‘त्या’ कारणावरून अवघ्या २१ दिवसात मुंबई मनपाने वसूल केला १ कोटी ६५ लाखाचा दंड

मुंबई :

सध्या मास्क घालणे हे महाराष्ट्रात सगळीकडे बंधनकारक आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे गांभीर्य नसले तरी मनपा कर्मचारी दंड लावतील म्हणून मास्क घालणारे महाभागही आहेत. अशातच मुंबई मनपाने १ ते २१ ऑक्टोबरदरम्यान ८२ हजारांपेक्षा जास्त मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे.

‘विना मास्क’ बाबतची ८२ टक्के कारवाई गेल्या २१ दिवसांत झाली असल्याची माहिती मनपाने दिली आहे. तसेच वेगवान आणि कडक पाऊले उचलत प्रशासनाने दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात केली आहे. १ कोटी ६५ लाख रुपये दंड अवघ्या २१ दिवसात मनपाने वसूल केला आहे.

यावरून सामान्य मुंबईकरांनी मनपा प्रशासनाचे या कार्यवाईबद्दल अभिनंदन करत ‘जी लोक रस्त्यावर थुंकतात, त्यांना सुद्धा दंड करा!! सोडू नका, अशी मागणी केली आहे. आपल्याला दंड होईल या भीतीने अनेक नागरिक मास्क वापरत आहेत. कोरोनाला इतके सहज घेऊ नका, काळजी घ्या, सुरक्षित अंतर पाळा, असे आवाहनही मुंबई मनपा प्रशासनातर्फे केले जात आहे.       

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here