धक्कादायक : कोविडसंदर्भात राज्यात झाले ‘एवढे’ गुन्हे दाखल; आकाराला ‘एवढा’ दंड

मुंबई :

लॉकडाऊन सुरू झाला आणि त्यानंतर कोविड सेंटरपासून तर अगदी हॉस्पिटलपर्यंत अनेक गुन्हेगारी घटना समोर आल्या. अशातच एका धक्कादायक बातमी समोर आली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ८६ हजार ८५४ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ४१ हजार ६५७ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ३३ कोटी १५ लाख ३४ हजार ८५८ रु. दंड आकारण्यात आला.

 राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते २१ ऑक्टोबर या कालावधीत :-

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३७८ (९०२ व्यक्ती ताब्यात) 

१०० नंबरवर आलेले फोन – १ लाख १४ हजार ६५

अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४७

जप्त केलेली वाहने – ९६,५९७

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील २४६ पोलीस व २६ अधिकारी अशा एकूण २७२ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here