पाणी फाउंडेशनच्या कामाची कमाल; गावाची समृद्धीकडे वाटचाल

अहमदनगर :

भिलवडे गावातील ग्रामस्थ आणि पाणी फाउंडेशन यांच्या मदतीने गावात गेल्या दोन वर्षांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आले होते. त्याचे चांगले परिणाम गेल्या वर्षीपासून दिसून येत आहेत अशी प्रतिक्रिया तेथील ग्रामस्थांनी दिली. हे गाव नगर जिल्ह्याच्या पूर्वेला आहे. गावाची लोकसंख्या 1800 परंतु गावात राहणारे केवळ 1000 आहेत. सतत पडणारा दुष्काळ व आर्थिक दुर्बलता याला कंटाळून अनेकांनी इतर गावात व  मुंबई नाशिक औरंगाबाद इत्यादी शहरांमध्ये स्थलांतर केले. गावाच्या एकूण क्षेत्रापैकी 80 टक्के बागायती क्षेत्र आहे शेतकरी गहू हरभरा ज्वारी इत्यादी रब्बी पिके घेत परंतु पावसाचे पाणी जमिनीत न मुरल्यामुळे रब्बी हंगामात पिकांना पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे अनेक वेळा पिके वाया गेली. यामुळे शेतकरी अनेक वेळा कर्जबाजारी होऊन कर्जाच्या चक्रात अडकलेले होते. उन्हाळ्यात अनेक वेळा या गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता.
2018 मध्ये गावातील काही तरुण शेतकऱ्यांच्या मनात आलं आणि गाव पाणीदार झालं लोकवर्गणीतून अकरा लाख रुपये जमा झाले. जैन सोशल फेडरेशन मार्फत यांत्रिक उपकरणे पुरविली. त्यातून जुन्या तलावाचे मजबुतीकरण, खोलीकरण, डीप सी सी टी, 25 शेततळे, कंपार्टमेंट बडिंग, नदीपात्र खोलीकरण, रुंदीकरण इत्यादी कामे केली.
या कामाचा परिणाम असा झाला की 2019 मध्ये चक्क दोन टक्के शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेऊन आर्थिक नफा कमावला आणि 2020 मध्ये तर चक्क काही शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड सुरू केली तर 2020 मध्ये काही शेतकऱ्यांनी तर चक्क ऊसाचे पीक सुद्धा घेतले. या जलसंधारणाच्या कामासाठी सर्व ग्रामस्थ तसेच सरपंच शोभा बडे, दीपक बडे, यांनी आर्थिक सहाय्य तर सुभाष बडे, सुरेश बडे, अजित बडे,संभाजी बडे यांनी तांत्रिक व व्यवस्थापनाचे मोलाचे सहकार्य केले. पुन्हा एकदा अशा प्रकारचे काम करण्याची शेतकऱ्यांची इच्छा आहे असे पांडुरंग बडे यांनी सांगितले आहे.

संपादन : अशोक बडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here