अशी बनवा टेस्ट मे बेस्ट ‘नवाबी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

बिर्याणी म्हटलं की सर्वांचीचं आवडती… मग ती व्हेज असो अथवा नॉन व्हेज. खूपच आवडती थिम मिळाली आहे. ही बिर्याणी खूपच चमचमीत आणि झणझणीत आहे. जर्दाळू, मनुका, बदाम, काजू आणि सूर्यफूल बियाणे यासारख्या कोरड्या फळांचा उपयोग झाल्यामुळे नवाबी मटन बिर्याणीचे नाव पडले. नेहमी मटनचे तेच ते प्रकार करून कंटाळा आला असेल तर हा बिर्याणी प्रकार नक्कीच ट्राय करून बघा.

साहित्य वाचा आणि लगेच बनवा :-

 1. 500 ग्रॅम बासमती तांदूळ
 2. 1 किलो मटण
 3. 10 मध्यम कांदे
 4. 2 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट
 5. 1 टेबलस्पून गरम मसाला
 6. 1 टेबलस्पून धणे पावडर
 7. 2 टेबलस्पून बिर्याणी शाही मसाला
 8. 4/5 काश्मिरी लाल मिरच्या
 9. 1 कप दही
 10. 2 दालचिनी
 11. 1/2 तमालपत्र
 12. 1 ब्राउन मोठी वेलची
 13. 4 हिरवी वेलची
 14. 1 टेबलस्पून शाहजिरे
 15. 5/6 काळी मिरी
 16. 1 टेबलस्पून हळद पावडर
 17. 1 टेबलस्पून लाल तिखट
 18. 2 चिमूट केशर
 19. 5 जर्दाळू
 20. 1/2 कप दूध
 21. 1 टेबलस्पून बदाम
 22. 1 टेबलस्पून काजू
 23. 1 टेबलस्पून सूर्यफूल बियाणे(परयायी)
 24. 1 टेबलस्पून मनुका

साहित्य घेतले का? घेतले असेल तर करा बनवायला सुरुवात

तूप गरम करून बदाम, काजू, मनुका, जर्दाळू (अर्धा) हलका तपकिरी रंग होईपर्यंत तळा. बाजूला ठेवा. त्याच तेलात कांदे कुरकुरीत होईपर्यंत तळा.

तळलेले कांदे बाजुला ठेवा. एका भांड्यामधे दही फेटा त्यामधे आले-लसूण पेस्ट, कांदा-मिरची पेस्ट, हळद आणि मीठ घालून १/२ तास मटण मॅरीनेट करा.

तूप गरम करावे आणि मॅरीनेट केलेले मांस कोरडे होईपर्यंत परतावे व तेल भांड्यामधे बाजूने सोडून द्यावे. पाणी घाला, शिजवा.

एका भांड्यामधे तूप गरम करून त्यात दालचिनी, वेलची, शहाजीरे आणि मिरे लवंग, तमालपत्र घाला. कोमट पाणी घाला.

तांदूळ घाला आणि 5 मिनिटे परता चवीनुसार मीठ घाला. तांदूळ होईपर्यंत शिजवा. पाणी काढून घ्या. एका चाळनीवर पसरून द्या.

एका पॅनमधे कांदा, टोमॅटो भाजून द्यावे. बाजूला ठेवा. मिक्सरला वाटा. एका कढईत तेलामधे कांदा, टोमॅटो पेस्ट वारिल सर्व मसाले, धणे पावडर, गरम मसाला शाही मसाला घालुन परतुन द्यावे. मटण घालुन शिजवा.

एक भांडे घेऊन तूप लावा. तयार मटण घाला आणि शिंपडा. शिजवलेला भात आणि तुपावर ठिपके घाला.तळलेले कांदे पसरा. भातात दुधात भिजलेला केशर घाला कांदे शिंपडा.

याप्रकारे लेअर बनवा. कोळसा तापवा. वरुन तूप घाला, दम देउन झाकून घ्या आणि कणकेसह सील करा.

एक तवा गरम करा आणि भांडे वर ठेवा आणि 20-25 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
चिरलेली पुदीना पाने कोथिंबीर मिसळून बिर्याणी खाण्यासाठी तय्यार….

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here