अशी बनवा चवदार आणि कुरकुरीत ‘तांदळाची चकली’; रेसिपी वाचा आणि ट्राय करा

आपण आजवर विविध प्रकारच्या, चवीच्या चकली खाल्ल्या असतील. चकली खरं तर दिवाळी स्पेशल आयटम आहे आणि चकली लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. आज आम्ही आपल्याला तांदळाची चकली कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 1 वाटी तांदळाचे पीठ
 2. १/ २ वाटी मैदा
 3. 1/२ टीस्पून लाल तिखट
 4. 1/२ टिस्पून हळद
 5. 1/2 टिस्पून धने पावडर
 6. 1/२ टिस्पून जिरे पावडर
 7. 2 वाटी तेल
 8. चवीनुसार मीठ

साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला

 1. एका परातमध्ये तांदळाचे पीठ घ्यावे. मैदा टाकावा. तिखट, मीठ, धने पावडर, हळद टाकावे. कढईमध्ये तेल गरम करून तेलाचे मोहन पिठामध्ये टाकले.
 2. मोहन टाकल्यानंतर पिठामध्ये मिक्स करून घेतले. नंतर पाणी घालून गोळा बनवून घेतला. गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले.
 3. चकलीचा साचा घ्यावा. भिजवलेलया पिठाचा गोळा करून साच्यात घालून चकली बनवून घेतले.
 • कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चकली टाकली.

झाली आपली चवदार आणि कुरकुरीत चकली तय्यार…    

संपादन :संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here