‘या’ पदार्थाचे सेवन करा आणि कायमच फिट राहा

आपण तब्येत वाढविण्यासाठी काजू, बदाम, मनुके असे पदार्थ खात असतो. विशेष करून मनुका आपल्या घरातील लहान मुलांना खायला दिला जातो करण त्यामुळे शारीरिक व मानसिक पोषण होते. मनुकामध्ये असणाऱ्या फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियममुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते तसेच स्मृती मजबूत होते. त्यामुळे मनुके खा आणि नेहमी फिट राहा.

जाणून घ्या फायदे :-

१) पाण्यामध्ये मनुका भिजवून खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

२) मनुक्याच्या सेवनामुळे ऍसिडिटी आणि थकवा दूर होण्यास मदत होते.

३) शरीरात रक्ताची कमी असल्यास, आपण दररोज 7-10 मनुका खाऊ शकता. ज्यामुळे रक्तवाढीस मदत होते.

४) रात्री अर्ध्या ग्लास पाण्यात 8-10 मनुका भिजवा. सकाळी उठून मनुकाचे पाणी अनशापोटी प्या. त्यामुळे काही दिवसांत उच्चरक्तदाबाची समस्या दूर होईल.

५) दररोज मनुकाचे पाणी सेवन केल्याने तुमचे यकृत निरोगी राहते आणि ते कार्य करण्यास प्रवृत्त होते. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here