तीन दिवसांच्या वाढीनंतर सोन्या – चांदीचे भाव घसरले; वाचा, आजचे दर

मुंबई :

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली कोसळत होते. ५७ हजाराला टेकलेले सोने आता थेट ५० हजारांवर आले होते. आता चालू महिन्यात भाव कमी-जास्त होत आहेत. सोन्य़ाच्या दरात बुधवारी वाढ पहायला मिळाली होती. 51333 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालेल्या सोन्य़ाच्या वायदा बाजारात आज 263 रुपयांची घसरण नोंदविली गेली आहे. बाजार उघडताना सोन्यामध्ये 134 रुपयांची घरसण झाली होती. तर चांदीच्या दरातही 695 रुपयांची घसरण नोंदविली गेली आहे.

अमेरिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. या पार्श्वभूमीवर तिथे अनेक घडामोडी घडत आहेत. त्याचा व्यावसायिक क्षेत्रावर परिणाम होत आहे. जगभरातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेत आर्थिक पॅकेजबाबत अद्यापही अनिश्तितता आहे. परिणामी सोन्याच्या किंमती सातत्याने उतरत आहेत. परदेश बाजाराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर नेहमी दिसून येत असतो.

येते काही महिने सोन्याचे भाव स्थिर राहतील. त्यात विशेष बदल होणार नाहीत, असा अंदाज सांगितला जात आहे. वर्षाच्या शेवटी मात्र भाव वाढू शकतात. डिसेंबरच्या अखेरीस सोन्यानं आतापर्यंतचा उच्चांक गाठलेला असेल, असे मत सराफा बाजारातील व्यावसायिकांनी व्यक्त केले. 

उत्सवांचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु मागणी नसल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ होत नाहीय. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 50,653 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. चांदीदेखील 61,512 रुपये प्रति किलो च्या पातळीवर बंद झाली. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात जोरदार चढ-उतार दिसून आले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here