बिहार निवडणूक : काय आहेत भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासने; वाचा ११ संकल्प

पटना :

देशात बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. विविध राजकीय पक्ष अनेक आश्वासने देत आहेत. अशातच कॉंग्रेसच्या साथीने निवडणूक लढविणाऱ्या तेजस्वी यादव यांनी पहिल्याच दिवशी १० लाख सरकारी नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले आहे तर भाजपने भले मोठे आश्वासन देत लोकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. ‘भाजपा है तो भरोसा है‘ घोषवाक्य समोर आणत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला कोरोनाचा लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरमान्यात दिले आहे. जाहीरनाम्यातील ११ संकल्प :-

१) कोरानाची लस आल्याबरोबर निःशुल्क देणार

२) मेडीकल/इंजिनिअरिंगचे शिक्षण हिंदी भाषेत देणार

३) ३ लाख शिक्षक भरणार

४) बिहारला #IT हब बनवणार, ५ लाख रोजगार देणार

५) १ कोटी महिलांना स्वावलंबी बनवणार, मायक्रो फायनान्स संस्थाद्वारे

६) १ लाख लोकांना आरोग्य यंत्रणेत नोकरी देणार

७) दरभंगा एम्स २०२४ पर्यंत निश्चीत करणार

८) ग्रामीण/शहरी भागातील ३० लाख लोकांना घर

९) १५ नवे प्रोसेसींग युनिट स्थापन करणार

१०) गोड्या पाण्यातील मासे उत्पादन वाढवणार

११) FPO मधून १० लाख रोजगार देणार (एकूण १९ लाख रोजगार उपलब्ध होणार)

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here