बिहारमधील जनतेला मोफत देणार कोरोना लस; ‘या’ पक्षाचे जाहिरनाम्यात आश्वासन

पटना :

देशभरासह जगभरात कोरोनाची लस कधी येणार, याकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे. अशातच देशात बिहार विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. विविध राजकीय पक्ष अनेक आश्वासने देत आहेत. अशातच कॉंग्रेसच्या साथीने निवडणूक लढविणाऱ्या तेजस्वी यादव यांनी १० लाख सरकारी नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले आहे तर भाजपने भले मोठे आश्वासन देत लोकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला कोरोनाचा लस मोफत देण्यात येईल, असे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरमान्यात दिले आहे. आज साडे दहाच्या सुमारास बिहार निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रसिद्ध केला.

सीतारमण यांनी म्हटले की, बिहारमधील प्रत्येक नागरिकाला येथील राजकीय परिस्थितीचा योग्य अंदाज आहे. त्यांना पक्षाने दिलेल्या आश्वासनांबद्दल योग्य माहिती आहे. आमच्या जाहीरनाम्यासंदर्भात कोणी प्रश्न विचारल्यास आम्ही त्याला नक्कीच योग्य उत्तर देऊ शकतो. आम्ही जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने योग्य पद्धतीने पूर्ण केल्याचे आत्मविश्वासाने सांगू शकतो.  

अद्याप लस उपलब्ध झालेली नसताना भाजपच्या या आश्वासनावर आता लोक विश्वास ठेवतील का? हा प्रश्नच आहे. तसेच निवडणूक जिंकल्यावर पहिल्याच दिवशी १० लाख लोकांना सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देणे शक्य होईल का? हाही मोठा प्रश्नच आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here