काही मजेशीर व्याख्या; वाचा की मंडळी….

अनुभव – सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह – जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखीहोतो
शेजारी – तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू – वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व – मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक – चार पानात लिहून संपणाऱ्यागोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फॅशन – शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

पासबुक – जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव
गॅलरी – मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी – एकाच वेळी असंख्य लोकांचागळा कापण्याचे साधन
छत्री – एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
कॉलेज – शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
परीक्षा – ज्ञान तपासून घेण्याचे एक ‘हातयंत्र’
परीक्षा – पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती – दोन महायुद्धांच्यामधला काळ
दाढी – ‘कुरुपपणा’ लपवण्याचे’ रुबाबदार’ साधन
थाप – आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर – कंजूषपणाचे एक ‘गोंडस’ नाव

नृत्य – पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे – नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचाबदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन – नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य – कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
विवाहित माणूस – जन्मठेपेचा कैदी
विधुर – जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा – चालतं बोलतं ATM कार्ड
श्रीमंत बायको – अचानक लागलेली लॉटरी
IT वाला – सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
IT वाली – श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी – ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
स्कार्फ – बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एकसाधन
चुंबन – रेशनकार्डाशिवाय मिळणारीसाखर
लग्नाचा हॉल – दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here