टकाटक मराठी खळखळून हसवणारे हे विनोद नक्कीच वाचा; पोटभर हसा

 • १) जपानमध्ये एका नामांकीत साबण कंपनीच्या कव्हर मध्ये
  साबण न टाकताच तसेच रिकामे कव्हर पाठवून दिले…..
  असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून
  तिथल्या इंजिनियर्सने ६० हजार डॉलर चे एक्स-रे मशीन
  विकत घेतले आणि प्रत्येक साबणाचे कव्हर चेक करून पुढे
  पाठवू लागले…..
  असाच प्रकार एकदा आपल्या महाराष्ट्रात झाला,

आपल्या मराठी इंजिनियर्स ने काय केले असेल!!!! 
विचार करा….
६०० रूपायचा टेबल फॅन आणला आणि साबणाचे कव्हर
त्यासमोरून पाठवले,रिकामे कव्हर आपोआप उडून गेले….
…..नाद नाही करायचा मराठी इंजिनियर्सचा……

 • २) रजनीकांत: लहानपणी माझ्या घरात लाईट नव्हती,
  म्हणून मी”अगरबत्ती लाऊन अभ्यास केला..!
  मक्या : हो का ? आमच्याकडे पण लोड शेडींग असायचं,
  नि अगरबत्ती पण नव्हती,
  मग काय माझं एक दोस्त व्हता,
  ‘प्रकाश’नावाचा,
  त्याला सोबत बसून अभ्यास केला,.
  पण पुढे तो पावसात भिजला नि विझला…

रजनीकांत: मग काय केलं?. . . . .
..मक्या : काय नाय, एक मैत्रीण पण होतो….
‘ज्योती’नावाची. .. 

 • ३) एक ६ फूट उंच पहिलवान माणूस बस मधून जात असतो.
  कंडक्टर :- भाऊ साहेब तिकीट घेता ना ?
  पहिलवान :- मी तिकीट नाही घेत कधी.
  कंडक्टर घाबरला.. हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम जॉईन केली..
  असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण
  बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला..
  काही दिवसांनी कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..
  पहिलवान : नाही
  कंडक्टर :- तुझ्या बापाची गाडी आहे का, तिकीट का नाही घेत ?
  पहिलवान :- पास आहे माझ्याकडे..
 • ४) एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली.
 • शिक्षक : तु आज लेट का आलीस?
  मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता..
  शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस.
  मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता…
 • एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,”प्रेम काय आहे???”
  हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले.
  “हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.
  हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू
 • ५) शिक्षक : सांगा पाहू
  विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?
  हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
  शिक्षक : काय ते?
  बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,
  पण आताच काही सांगू शकत नाही.
 • ६) एकदा अमेरिकेत चीन, पाकिस्तानी आणि भारतीय चम्प्या यांना २०-२० चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा झाली.
  चाबकाचे फटके मारण्या आधी सर्वांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यातआली.. .
  चायनीज – माझ्या पाठीवर ५चादरी बांधा आणि मग मला फटके द्या..
  अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली…मात्र ५ फटक्यातच चादरी फाटल्या आणि १५ फटके चायनीज ला पडले, तो कोमात गेला.
  आता पाकिस्तानी ची बारी..
  पाकिस्तानी – माझ्या पाठीला २० चादरी बांधा आणि मग फटके द्या…
  अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली…१५ फटक्यात चादरी फाटल्या आणि ५ फटक्यात पाकिस्तानी बेशुद्ध.
  आता आपल्या चाम्प्याची बारी होती,
  अमेरिकन – तुझी इच्छा कायआहे..?
  चम्प्या – मला २० फटक्याएवजी ३० फटके मारा..पण आधी त्या पाकिस्तानीला माझ्या पाठीला बांधा.
 • ७) काल सांच्याला मी ज्योतिषाकडे गेलतो.
  ते म्हणाले की,”बाळा तु खुप शिकणार आहेस.”
  मी हसायला लागलो.
  ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो काय म्हणाला,”बाळा, हसतोस काय? काय झालं काय?”
  ८) मी बोललो,”काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास कधी होणार ते सांगा की..”
 • एकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले…
  परत त्याने दुसर्यांदा तोच जोक सांगितला लोककमी हसले….
  परत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला , काहीच लोक हसले ..
  त्याने वारंवार तोच जोक सांगितला , लोक हसेनासे झाले…
  आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि,
  “जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर..
  एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here