शिवसेनेची पंकजा मुंडेंनी ‘ती’ थेट आणि जाहीर ऑफर; वाचा, काय आहे ऑफर

मुंबई :

नाराज असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचे नाव पुढे येते. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत हाती घड्याळ बांधले आहे. आता पंकजा मुंडे याही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहेत. अशातच त्यांना शिवसेनेकडून थेट आणि जाहीर ऑफर आली आहे.

भाजपानं जे पेरलं तेच आता उगवायला लागलं आहे. मागच्या वर्षी भाजपानं जी भरती केली होती त्याला उतरती कळा लागली आहे. एकनाथ खडसेंसारखे मोठे नेते राष्ट्रवादीत जात आहेत. भाजपातील आणखी ज्येष्ठ नेते नाराज असल्याचं कळतं, पंकजा मुंडेंसाठी शिवसेनेचं दार नेहमी उघडं आहे. पंकजा मुंडे यांचे स्वागत आहे असं शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे. तर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही अशीच थेट ऑफर दिली आहे.

गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की, ज्यांनी भाजपा पक्ष मोठा केला, त्या नेत्याची पंकजा मुंडे मुलगी आहे. पंकजा मुंडे यांच्यावर नेहमीच बाळासाहेबांनी प्रेम केलं, त्या शिवसेनेच्या कुटुंबातील आहे. बीडमध्ये पंकजा यांच्या भगिनी खासदारकीला उभ्या राहतात तेव्हा शिवसेनेनं कधीही उमेदवार दिला नाही हे उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here