ठाकरे सरकारकडे ‘त्यासाठी’ पैसे आहेत आणि शेतकऱ्यांसाठी नाहीत; भाजप प्रवक्त्याचा हल्लाबोल

मुंबई :

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. शिवारात पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आहे. सध्या शेतकऱ्यांना मदत देण्यावरून राजकारण चालू आहे, असे बोलले जात आहे. विरोधीपक्ष राज्याकडे बोट दाखवत आहे, राज्य केंद्राकडे बोट दाखवत आहे, अशी एकून परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपप्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांना देण्यासाठी, गोरगरीबाना पॅकेजसाठी, दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारकडे पैसे नाहीत. आणि कपिल सिब्बल यांना प्रत्येक सुनावणीस १० लाख देण्यासाठी, जाहिरात प्रसिध्दीसाठी कंत्राट देण्यासाठी, मंत्र्यांना गाडी घेण्यासाठी मात्र ठाकरे सरकारकडे पैसे आहेत.

दरम्यान खासदार संभाजीराजेंनी भाजप आणि महाविकास आघाडी सरकारला सुनावले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राजकीय कलगीतुरा बंद करून शेतकऱ्यांना थेट मदत पोचवा.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here