आब्बो.. खडसेंच्या राजीनामा पत्रात ‘इतक्या’ चुका; पाहा कुठे-काय झालीय चूक..!

राजकारणी मंडळींच्या एकूणच शालेय शिक्षणाचे अनेकदा वेगवेगळे किस्से समोर येत असतात. त्यामुळे समाजही त्यांच्या शैक्षणिक ‘ज्ञाना’कडे कानाडोळा करीत असतो. राजकारणात यशस्वी व्हायला लागणारे इतर गुण समाजाला महत्वाचे वाटतात. भाजपमधून राष्ट्रवादीमय झालेल्या एकनाथ खडसे यांच्याही त्याच गुणांना महत्व आहे. मात्र, शैक्षणिक चळवळीत झोकून देऊन काम करणारे शिक्षक हेरंब कुलकर्णी यांनी नाथाभाऊ यांच्या पत्रातील चुका दाखवून देणारी पोस्ट केली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, एका पत्रात किती शुद्धलेखन चुका असाव्यात ?? हे राजीनामा पत्र जर इंग्रजीत असते तर फक्त spelling च्या चुकांसाठी गाजले असते पण मराठीत शुद्धलेखन दुर्लक्षित असते.मी ही अनेक शब्द चुकतो पण दोन ओळीच्या राजीनामा पत्रात किती चुका असाव्यात ?

१) प्रती शब्द प्रति हवा

२)वैयक्तीक शब्द वैयक्तिक हवा

३)प्राथमीक शब्द प्राथमिक हवा

४)ऑक्टोबर वर टिंब दिलाय तो नको

५)वर महसुल शब्द महसूल हवा

६) कृषीमंत्री शब्द कसा लिहावा ?

७) विधानसभा हे जोडून हवे

नाथाभाऊ दोन ओळींच्या पत्रात की जे पत्र खूप फिरणार आहे त्याबाबत इतके दुर्लक्ष कसे होते ??

अर्थात तुम्ही बहुजन लोकांच्या शुद्धलेखन दोष काढणार आशय बघा या commentची मी वाट बघतोय

अशा पद्धतीने त्यांनी भाषिकदृष्ट्या असलेल्या चुका मांडल्याने अनेकांनी त्याची सकारात्मक दखल घेतली आहे. तर, काहींनी नेहमीच्या थाटात त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

https://www.facebook.com/photo?fbid=794001881173484&set=a.121143648459314

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here