शिवरायांनी त्याकाळी दिलेला आदेश दाखवत संभाजीराजेंनी भाजपसह महाविकास आघाडीला सुनावले; वाचा, ‘तो’ आदेश आणि संभाजीराजेंची भूमिका

मुंबई :

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. शिवारात पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आहे. सध्या शेतकऱ्यांना मदत देण्यावरून राजकारण चालू आहे, असे बोलले जात आहे. विरोधीपक्ष राज्याकडे बोट दाखवत आहे, राज्य केंद्राकडे बोट दाखवत आहे, अशी एकून परिस्थिती असल्यामुळे खासदार संभाजीराजेंनी कठोर भूमिका घेत ‘सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राजकीय कलगीतुरा बंद करून शेतकऱ्यांना थेट मदत पोचवा’, असे सुनावले आहे.

संभाजीराजेंनी ट्वीटरवर छत्रपती शिवरायांचा त्याकाळी दिलेला संदेश समोर आणत म्हटले आहे की, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राजकीय कलगीतुरा बंद करून शेतकऱ्यांना थेट मदत पोचवा. शिवरायांच्या नावाने समाजकारण, राजकारण जरूर करा. पण त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेला आदेश वाचून सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

काय आहे शिवरायांनी दिलेला तो संदेश :-

कष्ट करून गावोगावी फिरा. शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलगाडी आणि जोत हवा असेल त्याला ते द्या. पैसे द्या. खंडी दोन खंडी धान्य द्या. दिलेल्या मदतीचा वसूल वाडीदिडीने करू नका. मुद्दलच जेवढी हळूहळू ऐपत आल्यानंतर घ्या. त्यासाठी तिजोरीवर दोन लाख लारी बोजा पडला तरी चालेल – छत्रपती शिवाजी महाराज     

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here