खडसेंसाठी राष्ट्रवादीच्या ‘या’ दोघांपैकी जाऊ शकते एकाचे मंत्रीपद; वाचा काय आहे विषय

मुंबई :

भाजपमध्ये अत्यंत नाराज असणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करत भाजपला मोठा धक्का दिला. असे असले तरी मोठा जनाधार असलेल्या, उत्तर महाराष्ट्रातील ओबीसीसमाजाचे नेतृत्व करणाऱ्या खडसेंसारख्या बड्या नेत्याला मंत्रीपद मिळणार नाही, असे होणे शक्य नाही. खडसेंना मंत्रीपद मिळणर असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता कुणाचे मंत्रीपद काढून खडसेंना दिले जाणार हा मोठा प्रश्न आहे. सध्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड किंवा कामगार मंत्री दिलीप वळसे यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा होती.   

आव्हाडच का? :-

करमुसे या इंजिनीअरने केलेली अपहरण व मारहाणीचे प्रकरण सध्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणात न्यायालयाने आव्हाड यांच्यावर ताशेरे वगैरे मारल्यास ते राजकीयदृष्ट्या अधिक अडचणीचे ठरू शकते. सध्या आव्हाड हे शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे आव्हाड यांचे मंत्रीपद काढून घेण्यात येईल. आणि हे प्रदेशाध्यक्षपदी असतील, असेही म्हटले जात आहे.

वळसे पाटीलच का? :-

वळसे यांना तब्येतीमुळे फारसे सक्रीय राहता येत नसल्याची कुजबूज त्यांचे पक्षांतर्गत विरोधक करत असतात. 

खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आनंदात आहेत. गेल्या काही वर्षांपासून भाजपला तोंडावर पाडणारी अडचण गेली, म्हणून भाजप कार्यकर्ते आनंदात आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे चेहरे खडसे आल्यामुळे पडलेले आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here