म्हणून आता कांद्याचे दर होणार कमी; वाचा, काय आहे कारण

दिल्ली :

राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. विविध ठिकाणी पिक वाहून गेलेलं आहे. अशातच जुन्या कांद्याचे भाव वाढले आहेत. नव्या कांद्याची आवक आता कमी होणार असल्याने तसेच कमी प्रमाणात उपलब्ध असलेला जुना कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे. डिसेंबर पर्यंत कांद्याचे भाव चढे राहतील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. अशातच एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सरकारने कांद्याची निर्यात रोखली आहे. तरीही कांद्याच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने कांद्याची आयात वाढविण्यासाठी आयातीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. परिणामी याचा कांद्याच्या दरावर निश्चितच परिणाम होणार आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 5 डिसेंबरपर्यंत शिथील केलेल्या नियमांची अंमलबजावणी चालू राहणार आहे. दरम्यान केंद्र सरकार स्वतःकडील साठ्यातून बऱ्याच प्रमाणात कांदा उपलब्ध करणार आहे. लवकरच खरीपाचा 37 लाख टन कांदा बाजारपेठेत येणार आहे. त्यामुळे किमती कमी होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान   परराज्यातून कांद्याची मागणी वाढल्यामुळेही भाव वाढले असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी सांगत आहेत.  

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here