खडसेंच्या सोडचिठ्ठीनंतर भाजपने दिली ‘ही’ प्रतिक्रिया; पहा काय दिलीय प्रेसनोट

पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस जॉईन केली आहे. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या त्रासाबद्दल जाहीर वाच्यता केली आहे. तर, भाजपने पक्षाची भूमिका जाहीर केली आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी पक्षाने शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

पाटील यांनी म्हणाले आहे की, खडसे यांचा राजीनामा माझ्याकडे आला आहे. खडसे यांनी पक्षात राहावे अशीच आम्हा सर्वांची भूमिका होती. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. कितीही रागावले तरी ते पक्ष सोडतील असे वाटत होते. त्यांच्या नाराजीच्या मुद्द्यांवर काही ना काही मार्ग निघेल असे वाटत होते. आज सकाळीही मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. पण आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. ते ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी चांगले काम करावे यासाठी त्यांना शुभेच्छा.

खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्याबाबत मी काही बोलणार नाही.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here