राष्ट्रवादीने अशा पद्धतीने केले खडसे यांचे स्वागत; पहा काय चालू आहे ट्रेंडमध्ये

भाजपचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत येण्यासाठी निघालेल्या एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले आहे. फेसबुक आणि ट्विटरवर त्याचा ट्रेंड त्यांनी सेट केला आहे.

आमदार रोहित पवार यांचे जवळचे कार्यकर्ते गणेश शिंदे सरकार यांनी म्हटले आहे की, राशीन येथील सभेत ‘अजित दादा पवार’ म्हणाले होते. आज सत्ता जशी तुमच्याकडे आहे; उद्या आमच्याकडे असेल. कोणी जन्मतः ताम्रपट घेऊन जन्माला येत नाही. आज जशी तुमच्याकडे नेते लोक येत आहेत तशी उद्या आमच्याकडे सुद्धा येतील. त्यामुळं जास्त मिजाज नका करू. लक्षात ठेवा “हा सूर्य आणि हा जयद्रथ” आहे. उद्या या अजित पवार चे शब्द लक्षात असतील तुमच्या. अजित दादांच्या वाक्याची आज आठवण होत आहे ! #खडसे_यांचे_दिलसे_स्वागत

तर, पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी एक इमेज शेअर करून खडसे यांचे स्वागत केले आहे. इतरांनीही त्यांची हीच इमेज शेअर केली आहे. अजितदादा फॅन क्लबच्या खात्यावर म्हटले आहे की, एकनाथ खडसे यांनी भाजपला ठोकला रामराम, शुक्रवारी राष्ट्रवादी मध्ये करणार प्रवेश. खडसे साहेब आपले स्वागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here