म्हणून त्यावेळी युती तोडण्याची घोषणा केली होती; खडसे यांनी केले गौप्यस्फोट

भाजपचे सामान्य कार्यकर्ते असल्यापासून ४० वर्षे सातत्याने पक्षाच्या वाढीसाठी काम केलेल्या एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी त्यांनी आपली भूमिका मांडताना माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरटीका केली आहे.

खडसे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, त्यावेळी शिवसेना ब्व भाजप यांची युती तोडण्याची घोषणा मी केली होती कारण त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून आणि पक्षाचा प्रमुख नेता म्हणून मला ती जबाबदारी देण्यात आली होती. पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाचा तो सामुहिक निर्णय होता. त्यामुळे मी ती घोषणा केली.

पत्रकार परिषदेत खडसे यांनी आपल्या स्टाईलने भाजपच्या अनेक नेत्यांना आडेहात घेतले. तसेच दि. २३ ऑक्टोबर २०२० रोजी राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. ते म्हणाले की, चाळीस वर्षे पक्षासाठी काम केले. मीही पक्षाला खूप दिले. तसेच पक्षानेही मला खूप दिले. मात्र, एका व्यक्तीने खूप त्रास दिल्याने आता राष्ट्रवादीत जात आहे. त्याच पक्षाला वादावाण्यासाठी आता काम करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here