ब्रेकिंग : फडणवीसांवर खडसे यांनी केली ‘ही’ टीका; पहा काय म्हटलेय त्यांनी

मुख्यमंत्री असताना माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्यांशी मला अजिबात काम करण्याची इच्छा नसल्यानेभाजपला सोडचिठ्ठी देत असल्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, पक्षातील घटकांनीच मला त्रास दिला. त्यामुळे मी आता पक्ष सोडताना मला पक्षाने काय दिले ते सांगितले जात आहे. परंतु, मीही पक्ष वाढवायला मोठे योगदान दिले आहे. एकाच माणसाने मला खूप त्रास दिला. पक्षावर माझाही रोष नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही वेळोवेळी याची माहिती दिली. त्यांनीही त्याकडे लक्ष दिले नाही.

अशा पद्धतीने फडणवीस यांच्यावर नाव न घेता मात्र थेट टीका खडसे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here