असे निर्माण झाले पर्यावरण चळवळी आणि राजकारणाचे कनेक्शन; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा

1972 मध्ये स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या उपस्थितीत  पहिली परिषद पार पडली. या परिषदेचे दोन प्रामुख्याने फायदे झाले. पहिला म्हणजे ओझोनचा, जो आपण कालच्या भागात वाचला आणि दुसरा फायदा म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून असं बळ मिळालं की ज्यामुळे पर्यावरण विषयक काम करायला लोकांमध्ये उत्साह आला परिणामी  जवळपास सर्वच देशांमध्ये पर्यावरण चळवळी या सक्रियपणे काम करू लागल्या तसेच लोकही पर्यावरणाला गांभीर्याने घेऊ लागले. काही चळवळी यापूर्वीही चालूच होत्या पण त्यात भर पडली ती पाश्चिमात्य देशांमधील ‘ग्रीन पॉलिटिक्स’, ‘इको ग्रीन्स’, ‘ग्रीन मूव्हमेंट’ या चळवळीमुळे… दरम्यान औद्योगिकरण वाढले होते त्याचे परिणाम हे कुठल्या ना कुठल्या रूपात दिसणारच होते. ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होणार होता तसेच हे परिणाम पर्यावरण यांना अधिक आक्रमक बनवणार होते आणि घडलेही तसेच.

तेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा (भाग १) :- https://krushirang.com/2020/10/20/4457-paryavran-chalaval-itihas-bhag-1/

१९८४ मध्ये भोपाळमध्ये वायुगळती झाली त्याचा परिणाम असा झाला की जवळपास वीस हजार लोकांना या वायूगळतीच्या निगडीत आजारांमुळे मृत्यूला सामोरे जावे लागले तसेच लाखो लोक हे अपंग झाले. अशा अनेक घटना घडत होत्या. चेर्नोबिलच्या अणुभट्टीतील स्फोट, अलास्कामध्ये झालेली तेलगळती आणि आखाती युद्धात पेटविण्यात आलेल्या तेलविहिरी या घटना ही समोर आल्या. या सर्व घटना नंतर त्याच्या देशातील पर्यावरण चळवळी अधिक सक्रिय झाल्या, आक्रमक झाल्या. मग या चळवळींचे थेट राजकारणाशी कनेक्शन जोडले गेले. त्यानंतर पर्यावरण चळवळींचे मुद्दे हे राजकीय मुद्दे बनत गेले. त्याचा परिणाम आजही दिसतो युरोपमधील निवडणुकांमध्ये या चळवळी व त्यांचे मुद्दे आजही निर्णय ठरतात किंवा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पर्यावरणाचा मुद्दा गांभीर्याने चर्चिला जावा, यासाठी युरोपमध्ये सातत्याने आंदोलन होत असते. पर्यावरण हा राजकीय मुद्दा होऊ शकतो हे आम्हा भारतीयांना अजूनही ठाऊक नाही, आपल्या आरोग्य हा राजकीय मुद्दा आहे आपल्याला पाहिजे असलेल्या सोयीसुविधा हा राष्ट्रीय मुद्दा आहे, आपल्याला पाहिजे असलेला विकास हा राजकीय मुद्दा आहे आपले सार्वजनिक जीवन सुरक्षित राहावे हा राजकीय मुद्दा आहे, परंतु आपले प्राधान्यक्रम हे गटार, पाणी, रस्ते आणि फिरून फिरून जाती-धर्म या पाशी येऊन पडतात. याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे आपल्याला विकास आणि मूलभूत सुविधा यामधील फरक लक्षात घ्यायला हवा. 

तर या मुद्द्यांवर आपण नंतर बोलुयातच… 1989 मध्ये झालेल्या युरोपियन 90 लोकांमधून पहिल्यांदा पर्यावरणाचा मुद्दा प्रामुख्याने उचलण्यात आला आणि आजही आरोग्य पर्यावरण प्रदूषण सार्वजनिक जीवन हे मुद्दे तेथील राजकारणात प्राधान्याने लोक घेत असतात. पर्यावरणासाठी तेथील लोक आंदोलन करतात. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here