दिवाळी निमित्त कडक पुणेरी सूचना होताहेत व्हायरल; वाचा की मंडळी…

कृपया दिवाळीच्या शुभेच्छा कमीत कमी शब्दात द्याव्यात.
उगीच लांबड लावू नये.

अलंकारिक भाषा वापरून आमचा वेळ घालवू नये.
सरळ मुद्यावर यावे.

फटाके न उडविण्याविषयी प्रबोधन करू नये.

दिवाळीच्या दिवसांचे महत्च सांगणारे पोस्ट टाकू नये.
आम्हाला माहीत आहे.

मुकेश अंबानींच्या घरील दिवाळीचे फोटो टाकू नका.
आम्हाला कौतूक नाही.

सण साजरा न करता दान धर्माचे आवाहन करू नका.
आम्ही तो वेगळा करतो.

मागील वर्षीच्या पोस्ट चालणार नाहीत….

हुकुमावरून…! :- अखिल भारतीय पुणेरी होऊ डे व्हायरल संघटना (आमची शाखा भारतात सोडा, पुण्यातही नाही)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here