‘हे’ धडाकेबाज मराठी विनोद वाचून हसून हसून व्हाल लोटपोट

१) वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे?
बंडू रडत रडत,
.

.
पप्पा हि प्यांट
माझी नाही तुमची आहे.

२) रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून
खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं?
बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या
न मग झोपा.

३) एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ
पडतो.
बाजूने एक मुलगी जात
असते.
मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?
मुलगा: होय, वहिनी!:

४) मुलगा : मला तुमच्या मुली सोबत लग्न करायचंय
मुलीचा बाप : (चिडुन) मुर्खा तुझ्या पगारीत माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही ….
मुलगा : अरे बाप रे ईतकी शेमडी असेल तरराहुद्या 

५) खतरनाक प्रपोज :
शिंचन :- तु फक्त हो म्हण, सगळयांची वाट लावतो
मुलगी :अय्या खरंच
शिंचन:- हो खरंच..
आणि तु फक्त नाय म्हण
तुझी पण वाट लावतो..

६) जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला
नसता… कारण बायकोने विचारले असते…
कुठे चाललात?
कोणा बरोबर?
कसे जाणार?
काय शोधायला जाताय?
…इकडे मिळणार नाही का?
नेहमी तुम्हीच का?
मी इथे एकटी काय करू?
मित्र बरोबर असतीलच ना?
मी पण येऊ का?
कोलंबस: जाउ दे नाही जात…

७) गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोकनाचत
होते …… त्यात एक कुत्रा हि नाचत होता….
लोकांनी विचारले”तू का खुश आहेस?”………
त्यावर कुत्रा म्हणाला”वीज येईल तर खांब पण
लागतील ना !!!!…

८) जोक एकदम पाणचंट आहे
एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.
संता (चिडून ओरडतो) :
तू चड्डी नाही घालत का रे ?
कावळा :
तू चड्डीतच करतो का रे

९) एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो….
..
..
..
..
..
..
कंजूस काटा काढत स्वताशीच: आयला बरे झाले चप्पल घालून नाही आलो ते नाहीतर चप्पलला होल पडले असत..

१०) प्राणी संग्रहालयात आलेल्या एका माणसाला तिथल्या एका वाघाने मारले.
ते पाहून एका माकडाने विचारले: ” ओ वाघोबा! …एवढी गर्दी होती त्या गर्दी मध्ये तुम्ही एकाच माणसाच्या मागे होतात. सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं?”
वाघ: ” अरे मारू नाहीतर काय….?
अर्धा तास झाला माझ्याकडे बघून बोलत होता,
” एवढी मोठ्ठी मांजर! एवढी मोठ्ठी मांजर!”
“मग… माझी सटकली रे!!! क्योंकी कुछ भी करनेका……… लेकिन अपना इगो हर्ट नहीं करनेका…!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here