न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा यांचा ‘तो’ विचार रोहित पवारांना भावला; वाचा, काय म्हटले पवारांनी

मुंबई :

न्युझीलंडच्या नवनिर्वाचित पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न या सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. कोरोनावर त्यांनी देशाच्या साथीने केलेली मात संपूर्ण जगाने पहिली. त्यांच्यातील माणुसकी आणि जमिनीवर असण्याच्या वृत्तीचेही नेहमी कौतुक होत असते. एकूणच काय तर त्यांच्या प्रत्येक कृतीचे कौतुक होत असते. दरम्यान त्यांनी आपले लोकशाही बद्दलचे काही विचार प्रकट केले आणि ते युवा अभ्यासू आमदार रोहित पवारांना भावले.

निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न म्हणाल्या की, देशातील लोकांमध्ये धार्मिक संघर्ष निर्माण न करता किंवा सीमेवर युद्धजन्य परिस्थिती तयार न करताही तुम्ही निवडणूक जिंकू शकता. हेच विचार रोहित पवारांना भावले आणि त्यांनी हे विचार ट्वीटर वर शेअरही केले.

रोहित पवार ट्वीट करत म्हणाले की, लोकशाही शासनव्यवस्थेला बळकटी देणारा न्युझीलंडच्या नवनिर्वाचित पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांचा हा विचार मला खूप भावला. त्यामुळं शेअर करण्याचा मोह आवरला नाही.

रोहित पवारांनी हा नेहमीप्रमाणे अप्रत्यक्षरित्या टोला हाणला आहे. ते नेहमीच असे अप्रत्यक्ष आणि नेमकी खोचक अशी टीका करत असतात.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here