सणासुदीच्या मुहूर्तावर सोने महागले; वाचा, काय आहेत दर

मुंबई :

सणासुदीच्या मुहूर्तावर सोने महागले आहे. डॉलरमध्ये आलेली कमजोरी, अमेरिकेतील आर्थिक पॅकेजबाबत अनिश्चितता त्याचप्रमाणे अमेरिकन अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. तसेच भारतातील सणासुदीचा काळही सोने महागण्याचे कारण आहे. कमॉडिटी बाजारात मंगळवारी सोने आणि चांदीच्या भावात तेजी दिसून आली. बाजार बंद होताना सोने २२६ रुपयांनी महागले. सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ५०६८७ रुपयांवर बंद झाला. एक किलो चांदीचा भाव ६२०९५ रुपयांवर गेला. त्यात ९७० रुपयांची वाढ झाली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील तेजीनंतर देशांतर्गत बाजारात देखील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली कोसळत होते. ५७ हजाराला टेकलेले सोने आता थेट ५० हजारांवर आले होते. आता चालू महिन्यात सोन्याचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. एकूणच सोन्याची भाव घसरल्यामुळे सोने खरेदी करण्यास मागील काही दिवसांत सुवर्णसंधी होती. आता मात्र सोन्याचे भाव पुन्हा चढू लागले आहेत. सराफा बाजारात देखील स्पॉट गोल्ड ५०९७६ रुपये प्रती १० ग्रॅम इतके होते. तर चांदीचा भाव ६२१८७ रुपये प्रती किलो होता.

goodreturns या वेबसाईटनुसार बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९६४० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५०६४० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४९३१० रुपये आहे. तर २४ कॅरेटसाठी तो ५३७९० रुपये आहे. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here