विवोचा ‘हा’ बेस्ट स्मार्टफोन येतोय अवघ्या ३०९६ रुपयांत; वाचा कसा ते

मुंबई :

‘अवघ्या ३०९६ रुपयांत मिळणारा स्मार्टफोन’ ही कल्पनाचा सामान्य माणसांना सुखावणारी आहे. मात्र आता ही कल्पना सत्यात उतरू शकते. सणवाराच्या निमित्ताने ई-कॉमर्स आणि मोबाईलकंपन्या भरघोस ऑफर्स देत आहेत. अशाच एका ऑफरअंतर्गत प्रसिद्ध स्मार्टफोन Vivo U10 ला तुम्ही अवघ्या ३ हजार ९६ रुपयांत खरेदी करू शकता. अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये युजर्सला स्मार्टफोन्सवर वर्षाची ही सर्वात बेस्ट आणि मोठी डील मिळत आहे.

विवो इतक्या कमी किंमतीत हा फोन गॅरंटीड एक्सचेंज प्लान अंतर्गत ऑफर करीत आहे. या ऑफर अंतर्गत विवोचा फोन खरेदी करणे सोपे झाले आहे. फोन घेण्यासाठी तुम्हाला विवो कंपनीचा एक्सचेंज प्लान घ्यावा लागणार आहे. कंपनी ९९ रुपयांच्या एक्सचेंज प्लानच्या बदल्यात १२ महिन्यात फोनची किंमत ७० टक्क्यांपर्यंत बचत करण्याचा फायदा देत आहे. या प्लान अंतर्गत विवो यू १० खरेदी ९९९० रुपयांचा सोबत ९९ रुपयांचा गॅरंटीड एक्सचेंज प्लान घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या फोनची किंमत १० हजार ८९ रुपये होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here