म्हणून चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत खडसे; पहा थोर नेत्यांचे काय म्हणणे आहे नेमके

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षांतर करून राष्ट्रवादीमय होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या नेमक्या वावड्या आहेत की त्यात काहीही तथ्य आहे यावर अजूनही ठोस उत्तर मिळालेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची त्यांच्या पक्षप्रवेशावर अनेकदा बैठक झाल्याचे कार्यकर्ते सांगतात. तर, भाजपवाल्यांनी ते पक्ष अजिबात सोडणार नसल्याचे म्हटले आहे.

अशावेळी एक बातमी व्हायरल होत आहे की, खडसे यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खऱ्या अर्थाने तो त्यांचा राजीनामा नसून माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याच बाबतचा नाराजीनामा असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे ते अजिबात पक्ष सोनदार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पंकजाताई मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खडसे कसे आता आमचेच असल्याचे म्हणण्यास सुरुवात केली आहे त्याचवेळी फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते खडसे यांन राजकारण समजते. त्यामुळे ते भाजपमधून बाहेर पडणार नसल्याची स्पष्ट ग्वाही दिली आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे की, भाजपच्या उभारणीत मोठे योगदान असताना आघाडीची सत्ता असताना विरोधकांच्या बाजूने ते प्रखरतेने लढत होते. मात्र, दुर्देवाने त्यांची नोंद त्यांच्या पक्षाने  घेतली नसल्याने जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते. पवार यांनी अशा पद्धतीने काहीही उत्तर न देणारी भूमिका घेऊन संशय वाढवला आहे.

एकूणच फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी आणि आमदार गिरीश महाजन गटाने खडसे गटाला लक्ष्य केल्याने खडसे नाराज असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची तयारीही केली आहे. तर, भाजपला ते अजिबात जाणार नसल्याचे वाटत आहे. परिणामी खडसे सध्या राज्यात केंद्रस्थानी आलेले आहेत.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here