पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस; पुण्याला दिला ‘हा’ इशारा

पुणे :

पावसामुळे राज्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर झाली आहे. असे असले तरी शहरातही आता पावसाचा धोका वाढतो आहे. पुण्यातील हवेली तालुक्यात रविवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटीसदृश पाऊस झाला. पुण्यात अजूनही काही ठिकाणी पाऊस चालू आहे. दिवसभर विश्रांती घेतलेला पाऊस मंगळवारी रात्री धुवाँधार बरसला. रात्री शहराच्या विविध भागात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडला.

दरम्यान कालच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी 51 ते 75 टक्के मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस शहरात मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा तर घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. ऑक्टोबर हिटच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना ऑक्टोबरच्या पावसाने धडकी भरवली आहे. 

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. शिवारात पाणीच पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here