पीएम-किसान निधीत मोठा घोटाळा; वाचा, कुणाची होणार चौकशी

दिल्ली :

आपण शेतकरी असल्याचे भासवत अनेक नोकरदार, श्रीमंत मंडळी सरकारी योजनेचे लाभ आणि त्यातील पैसे लाटण्यासाठी कागदोपत्री शेतकरी होतात. मात्र आता अशा बनावट शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज आहे. पंतप्रधान किसान योजनेचा एक नवा घोटाळा समोर आला आहे. या योजनेचा लाभ बनावट शेतकरी लाभार्थींनी घेतल्याची घटना समोर आली आहे. परिणामी या बनावट शेतकऱ्यांमुळे योजनेतील निधीला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याचेही उघड झाले आहे. हा घोटाळा समोर आल्यानंतर केंद्र सरकारने यावर तातडीने कार्यवाहीचे आदेश दिल्याचे समजत आहे. या घोटाळ्याची देशव्यापी चौकशी करा, असे केंद्र सरकारने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

केंद्र सरकार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये पाठवते. तामिळनाडूत या योजनेतील मोठा घोटाळा उघडकीस आला. यामुळे केंद्र सरकारने लाभार्थी हा खरोखर शेतकरीच आहे का?, याची प्रत्यक्ष खातरजमा करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. लाभार्थींची ओळख पटवण्याची जबाबदारी ही राज्यांची असल्यामुळे या योजनेत गमवावा लागलेला पैसा परत मिळवून केंद्राला तो परत करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे.

अशी आहे आकडेवारी :-

एकूण शेतकरी : १४.६४ कोटी
पीएम-किसानचे लाभार्थी : ११.०७ कोटी
महाराष्ट्रातील लाभार्थी : १.१० कोटी
दिलेला निधी : १.१० लाख कोटी
बनावट लाभार्थी उघडकीस : ५.३८ लाख तामिळनाडूत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here