भर प्रचारसभेत ‘या’ बड्या नेत्यावर फेकण्यात आल्या चपला; व्हिडीओ व्हायरल

औरंगाबाद :

बिहार निवडणूकीचे वारे जोरात आहे. प्रचारसभांनी तसेच राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. अशातच राष्ट्रीय जनता दलाच्या प्रचारसभेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी गेलेल्या तेजस्वी यादव त्यांच्यावर चपला फेकण्यात आल्या.

या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडीओत २ चपला तेजस्वी यांच्यावर फेकण्यात आल्या. एक चप्पल त्यांच्या बाजूने गेली तर दुसरी त्यांच्या अंगावर आली. दरम्यान या घटनेचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज लोकांना आला. मात्र तेजस्वी यादव यांच्यावर या घटनेचा कुठलाच परिणाम झाला नाही. विशेष म्हणजे आपल्या संपूर्ण भाषणात या घटनेचा उल्लेखही त्यांनी केला नाही.

सदर चप्पलफेक करणारी व्यक्ती दिव्यांग आहे. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ त्या व्यक्तीला सभेतून बाहेर काढलं अशी माहिती सूत्रांनी हवाल्याने पीटीआयने दिली आहे. ठरलेल्या वेळेप्रमाणे तेजस्वी यादव कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारकरिता भरवलेल्या सभेसाठी हजर राहिले होते. तेजस्वी यादव यांच्या मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. तेजस्वी   मंचावर पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि काही वेळातच हा प्रकार घडला.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here