सांगताय काय; ‘या’ नावाजलेल्या कंपनीची कोणतीही चारचाकी घेता येणार अवघ्या 799 रुपयांच्या हफ्यात

मुंबई :

आपल्या दारासमोर चारचाकी मोटार असणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आता हे स्वप्न पूर्णही होऊ शकतं. चालू वर्षी एका मोठ्या नावाजलेल्या कंपनीच्या स्कीमनुसार तुम्हाला अवघ्या ८०० रुपयांच्या हफ्त्यावर एखादी चारचाकी मोटार घेता येणार आहे. टाटा मोटर्स कमीत-कमी ईएमआयमध्ये कार घरी नेण्याची ऑफर देत आहेत. ग्राहक फक्त 799 रुपयांच्या किमान हप्त्यात टाटा मोटर्सची कोणतीही कार खरेदी करू शकतात.

देशातल्या गरीब व्यक्तीकडे सुद्धा चारचाकी असावी म्हणून टाटांनी लौन्च केलेली मोटार विशेष चालली नाही. मात्र आता आपल्या स्वप्नांची जबाबदारी टाटा घेत आहे. ही स्कीम देऊन टाटा प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावणार आहे.

उत्सवाच्या हंगामात विक्री वाढविण्यासाठी आणि उत्पादनाला प्रवेश सुलभ करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने ‘ग्रॅज्युएट स्टेप अप स्कीम’ आणि ‘टीएमएल फ्लेक्सी ड्राइव्ह स्कीम’ या दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. या दोन्ही योजना नोव्हेंबर 2020 अखेरपर्यंत उपलब्ध होतील, अशी माहिती टाटा मोटर्सने दिली आहे. विशेष बाब म्हणजे या किमान हप्त्याच्या योजनेसाठी टाटा मोटर्सने एचडीएफसी बँकेशी हातमिळवणी केली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here