करोनाच्या काळातही ‘त्यांना’ मिळाला ४५ टक्क्यांचा ‘जॅक’पॉट; पहा कोण आहेत ते तिघे महाश्रीमंत

एकीकडे करोनामुळे अवघे जग लॉकडाऊन होत असतानाच जगभरातील श्रीमंत मंडळींची श्रीमंती आणखी झपाट्याने वाढत आहे. भारतात अशाच पद्धतीने रिलायन्स कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची संपत्ती वाढत असतानाच शेजारील चीनमध्ये तीनही बड्या श्रीमंतांना मोठा ‘जॅक’पॉट लागला आहे.

होय, चीनमध्ये सर्वात श्रीमंत असलेल्या अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांच्या संपत्तीत मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ४५ टक्के इतकी वाढ झाली आहे. चीनी सरकारच्या लाडक्या असलेल्या या उद्योजकाने आपली संपत्ती आता थेट ५८.८ अब्ज डॉलर इतक्यावर नेली आहे. लॉकडाऊन कालावधीत ऑनलाईन डिमांड वाढल्याने ही ग्रोथ झाल्याचे अंदाज आहेत.

हुरुन रिसर्च इंस्टीट्यूट यांचे संस्थापक रुपर्ट हुग्वेर्फ यांनी चीनमधील श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार यात दुसऱ्या स्थानावर वीचैट (WeChat) मेसेजिंग सेवा चालविणाऱ्या टेन्सेंट (Tencent) कंपनीचे संस्थापक मा हुआतेंग हे ५७.४ अब्ज डॉलरचे धनी आहेत. तर, नोंगफू स्प्रिंग या बाटलीबंद पाण्याच्या विक्रीमधील बादशाह असलेल्या कंपनीचे चेअरमन झोंग शानशान यांची संपत्ती ५० टक्क्यांनी वाढून ५३.७ अब्ज डॉलर इतकी झालेली असल्याने तेही तिसऱ्या स्थानावर पक्के झालेले आहेत.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here