म्हणून ‘त्या’ गावांमध्ये येणार चैतन्य; पहा निवडणूक आयोगाने नेमकी काय केलीय घोषणा

गावांमध्ये असलेले चैतन्य करोनाच्या संकटासह यंदा झालेल्या जोरदार पावसाने पुरते लोपले आहे. त्याचवेळी काही गावांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य आणणारी घोषणा महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाने केली आहे. होय, त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे.

थेट तारखा काही अजूनही जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होण्याचा मार्गच खुला झालेला आहे. त्यासाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाला हिरवा कंदील मिळालेला आहे. दि. २७ ऑक्टोबर २०२० पासून ही प्रक्रिया सुरू होत आहे.

जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या आणि जिथे पोटनिवडणूक घेण्याची गरज आहे अशा सर्व गावांमध्ये या निर्णयाने चैतन्य भारले आहे. अशा पद्धतीने आता गावांमध्ये कुरघोडीच्या राजकारणाला ऊत येणार आहे.

करोना विषाणूची साथ आल्याने घाईत देशभरात सगळीकडे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यावेळी दि. १७ मार्च रोजीच्या आदेशानुसार सर्व निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता करोनाचे संकट लॉकडाऊनने संपणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने सगळे खुले होत असतानाच बिहार निवडणूक होत असताना महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.

प्रमुख तारखा अशा :

१८ ऑक्टोबर २०२० : उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्रभागरचना आणि मतदार यादीचे प्रारूप तपासणी

२ नोव्हेंबर २०२० : जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने प्रभागरचना आणि मतदार यादी यांना प्रसिद्धी देणे

संपादन : महादेव गवळी  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here