आब..बो.. कांद्याला मिळाला १२१ रुपयांचा भाव; पहा राज्यभरात कुठे किती मिळालाय बाजारभाव

पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या सरकारने कांद्याची निर्यातबंदी लागू करूनही कांद्याची भाववाढ रोखली गेलेली नाही. उलट आता तर नव्या जोमाने कांद्याचे भाव वाढत आहेत. आज महाराष्ट्रातील काही बाजार समितीत कांद्याने प्रतिकिलो थेट १०० रुपयांचा टप्पा ओलांडून उच्चांक प्रस्थापित केला आहे.

पुणे जिल्यातील जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे सर्वाधिक १२१ रुपये किलो भाव मिळाला. कालही शेवगाव (जि. अहमदनगर) येथे कांद्याला १३० रुपये किलो इतका भाव मिळाला होता. पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ही भाववाढ झालेली आहे. लाखो शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान झालेले असतानाच मोजक्या का होईना शेतकऱ्यांना आता या भाववाढीने अच्छे दिन पाहायला मिळत आहेत.

मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२० रोजीचे बाजारभाव असे :

बाजार समिती आवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर2187250080005000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट5784500085006750
सातारा56200070004500
मोर्शी18400050004500
नांदूरा17155042004200
जुन्नर -आळेफाटा60414510121108510
कराड99300065006500
सोलापूर10614500100003500
पंढरपूर100110085004000
नागपूर1500400055005125
सांगली -फळे भाजीपाला1250200082005000
पुणे10267200082005100
पुणे- खडकी19200070004500
पुणे -पिंपरी5480050004900
पुणे-मांजरी26220050003300
पुणे-मोशी65180060003900
मलकापूर80250058005425
नागपूर1082400055005125
येवला -आंदरसूल2000150082506700
नाशिक741325070505250
लासलगाव7370190178127100
मालेगाव-मुंगसे5000300568055950
राहूरी1140950075006000
चांदवड4400190070006100
मनमाड2000200065556100
सटाणा5015210083256950
कोपरगाव3812200073736900
पिंपळगाव बसवंत11815200181807000
पिंपळगाव(ब) – सायखेडा2461110069006300
दिंडोरी-वणी1230600085707300
देवळा3775500080007000
राहता25392000105006950
उमराणे11500170085006500

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here