सोन्या-चांदीचे भावही घसरले; वाचा काय आहेत नवे दर

दिल्ली :

अमेरिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. या पार्श्वभूमीवर तिथे अनेक घडामोडी घडत आहेत. त्याचा व्यावसायिक क्षेत्रावर परिणाम होत आहे.  जगभरातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेत आर्थिक पॅकेजबाबत अद्यापही अनिश्तितता आहे. परिणामी सोन्याच्या किंमती सातत्याने उतरत आहेत. परदेश बाजाराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर नेहमी दिसून येत असतो.

याचाच परिणाम आज देशांतर्गत बाजारावर देखील दिसून आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली कोसळत होते. ५७ हजाराला टेकलेले सोने आता थेट ५० हजारांवर आले होते. आता चालू महिन्यात भाव कमी-जास्त होत आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 268 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीच्या दरात 1126 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. 

येते काही महिने सोन्याचे भाव स्थिर राहतील. त्यात विशेष बदल होणार नाहीत, असा अंदाज सांगितला जात आहे. वर्षाच्या शेवटी मात्र भाव वाढू शकतात. डिसेंबरच्या अखेरीस सोन्यानं आतापर्यंतचा उच्चांक गाठलेला असेल, असे मत सराफा बाजारातील व्यावसायिकांनी व्यक्त केले. मंगळवारी चांदीचे दर देखील कमी झाले आहेत. चांदी 1126 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचे दर 62,189 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. तर सोमवारी चांदीचे दर 63,315 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत होते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here