पंतप्रधान मोदींनी दिली महत्वाची माहिती; लॉकडाऊन गेला पण…

दिल्ली :

आज कोरोनासह विविध विषयांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. . नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजताच्या वेळेला छेद देत मोदींनी नवीन वेळ निश्चित केली आहे. ६ वाजता त्यांनी देशवासियांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. यावेळी लॉकडाऊन बाबत त्यांनी फार महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या सात-आठ महिन्यात भारताने कोरोनावर चांगलं मिळवलं आहे. ही परिस्थिती आपल्याला कायम ठेवायची आहे. देशातून लॉकडाऊन गेला असला तरी व्हायरस गेलेला नाही. त्यामुळे अजूनही सतर्कता बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मोदींनी केलेल्या भाषणातील हे आहेत महत्वाचे मुद्दे :-

– भारतात कोरोनाच्या अनेक लसिंवर काम सुरू.
-लस विकसित करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू.
-जोपर्यंत ओषध येत नाही तोपर्यंत हालगरजीपणा करू नका.
-प्रत्येक पातळीवर काळजी घेणं आवश्यक.
-सणासुदीच्या काळात हालगर्जीपणा करू नका.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here