मोदींच्या भाषणाआधीच चीनच्या विषयावरून राहुल गांधी कडाडले; मोदीजी, ‘ती’ तारीख सांगा जेव्हा….

दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी (मंगळवार 20 ऑक्टोबर) 6 वाजता देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजताच्या वेळेला छेद देत मोदींनी नवीन वेळ निश्चित केली आहे. कोरोना, अनलॉक, भारतीय अर्थव्यवस्था, भारत-चीन संबंध अशा कोणत्या विषयावर मोदी भाष्य करणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधीनी चीनच्या विषयावरून मोदींना छेडले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आपल्या सहा वाजताच्या संदेशात कृपया देशाला तारिख द्या की, तुम्ही चीनला भारताच्या बाहेर कधी काढणार आहात?

या ट्वीटला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी रीट्वीटही केले आहे. पंतप्रधान मोदी आज कोणत्या मुद्यावर बोलणार याबाबत सोशल मिडियावर तुफान चर्चा चालू आहे. त्यावरून मिम्सही शेअर केले जात आहेत. नेटकरी विविध मुद्द्यांवर मोदींनी बोलावं, अशी मतं मांडत आहेत. राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांनी काय बोलावं याबाबत ट्विट केलं आहे. काही मिनिटांमध्येच हे ट्विट सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here