कोंड्यासाठी शॅम्पू वापरून थकलात; करा ‘हे’ घरगुती उपाय

शॅम्पू वापरला की कोंडा जातो पण शॅम्पू वापरणे बंद झाले की परत कोंडा दिसू लागतो. नंतर मग शॅम्पूचा जास्त वापर झाला की केस गळू लागतात मग ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी परिस्थिती होते. आता शॅम्पू वापरून थकला असाल तर हे घरगुती उपाय करा आणि कोंड्यापासून मुक्ती मिळवा.
1) नारळाचे, एरंडाचे, आणि मोहरीचे असे तीन प्रकारचे तेल एकत्र करा. त्याचे मिश्रण डोक्यावर लावून मालिश करा. थोड्याच दिवसात सगळं कोंडा निघून जाईल. फक्त तेल एकत्र करताना तिन्ही तेल हे समान घ्या. म्हणजे एकाच चमच्याने तिन्ही तेल घ्या म्हणजे तिन्ही तेलाचे माप बरोबर येईल. 
2) नारळाचे तेल व ऑलिव्ह तेल हे एकत्र घ्या. त्यात लिंबू पीळा. अगदी 5-7 थेंब पडू द्या. मग मालिश करा.मग गरम टॉवेल ३ मिनिट डोक्यावर ठेवा. दररोज केस धुण्यापूर्वी हा उपाय करावा.
3) आवळ्याचा रस आणि ऑलिव्ह तेल एकत्र करून मिश्रण करावे. मग डोक्याची मालिश केल्यास कोंडा निघून जाईल.

4) जास्वंदाचे फुल हे सहजासहजी उपलब्ध होते. ते फुल घेऊन त्याची बारीक पेस्ट करा. मग ही पेस्ट केसांवर लावा. त्यानेही कोंडा नष्ट होण्यास मदत होते.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here