फ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठरतेय ‘या’ गंभीर आजारांचं कारण

उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील अनेक लोकांचे माठ वापरात येतात पण तरुणाई मात्र फ्रिजमधील पाणी पिण्यास प्राधान्य देते. वरवर पाहता आपल्याला वाटते उष्णता कमी होते. शरिराला थंड जाणवते. असं तुम्हाला वाटत असर फायद्यांबरोबरच थंड पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम सुद्धा आहेत. 
बद्धकोष्ठता : फ्रिजचं थंड पाणी प्यायल्याने आपल्या आतड्या आंकुचन पावतात आणि जेवण नीट पचत नाही. पोटातील जेवण वारंवार न पचल्याने बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.  
सर्दी-खोकला : फ्रिजमधलं थंड पाणी वारंवार प्यायल्याने छातीत कफ जमा होतो, ज्यामुळे आपली प्रतिकारक्षमता कमी होते आणि आपल्याला लगेच सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागतो.  त्यामुळे माठातील पाणी पिणे कधीही उत्तम.
हृदयासाठी धोकादायक :जेव्हा आपण थंड पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरातील वेगस नर्व्ह थंड होऊन हार्ट रेट म्हणजेच हृदयाची धडधड कमी वेगाने होते. जे आपल्या हृदयाच्या कार्यासाठी योग्य नाही.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here