तेव्हा मान्य केले गेले ओझोनचे अस्तित्व; वाचा इतिहास पर्यावरण चळवळींचा

जसजसा माणसाने औद्योगिकीकरणाचा वेग वाढवला तसतसे आपल्यासमोर पर्यावरणाचे दुष्परिणाम समोर येऊ लागले. अजूनही आपण पर्यावरणाच्या परिणामांना गांभीर्याने पाहत नाहीत. त्याचे कारण थेट आपल्या बालपणात दडलेले आहे, त्यावर आपण पुढील भागात चर्चा करूयात सध्या आपण पर्यावरण, संबंधित चळवळी यावर चर्चा करूयात. 

वरती म्हटल्याप्रमाणे औद्योगिकीकरणाचा घेतलेला वसा पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास कारणीभूत ठरला आहे. पर्यावरणाचा थेट फटका हा मानवी समाजाला बसत असतो पण तो जाणवत नाही कारण त्याचे परिणाम हे वेगवेगळ्या अंगाने दिसत असतात. जसा पर्यावरणाचा फटका आपल्याला बसू लागला तसा या मुद्द्यांना सामाजिक आणि राजकीय आयाम आले. यातूनच पुढे काही पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संघटना स्थापन झाल्या. ‘ग्रीनपीस,’ ‘ग्रीन नेटवर्क’, ‘फ्रेंड्स ऑफ अर्थ’ या संघटना जेव्हा आकाराला येत होत्या तेव्हा आपल्याला पर्यावरण कशासोबत खायचे हेही कळत नव्हते.

दरम्यान पर्यावरण संघटना इतक्या फॉर्ममध्ये आल्या की आंतरराष्ट्रीय व्यासपीठालाही त्याची दखल घ्यावी लागली. त्यांचा संघर्ष, मुद्दे, लढण्याची शैली हे सगळे रास्त होते. त्यामुळे यातूनच पुढे जगातील पहिली मानव-पर्यावरण परिषद झाली. 

नुकतीच एक बातमी येऊन गेली की ओझोनचा थर जो आहे तो बुजत आहे. कारण प्रदूषण कमी झाले आहे. आता त्यात खरे किती खोटे किती याबाबत कल्पना नाही. पण ओझोनच्या थर आहे आणि पर्यावरणाचे परिणाम त्यावर होतात. तसेच इतरही काही गोष्टी ज्या ओझोनशी संबंधित होत्या. त्या या परिषदेच्या निमित्ताने समोर आल्या. ओझोनचे वास्तव पहिल्यांदा या परिषदेत मान्य केले गेले. (पर्यावरण चळवळींचा इतिहास भाग २ उद्या सकाळी १० वाजता प्रकाशित केला जाईल.)

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here