अशी बनवा ‘हैद्राबादी मटण दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

बिर्याणी ही शाही रुबाब असलेली रेसिपी आहे. जेवढी शाही तेवढीच किचकट आणि तेवढीच लज्जतदार अशी ही रेसिपी…
बिर्याणी मध्ये मॅरीनेशन ही प्रक्रिया खूप महत्त्वाची. जेव्हा आपण मॅरीनेशन करण्यासाठी दही वापरतो तेव्हा चिकन, मटण किंवा बाकीच्याही पदार्थ तेव्हा ते पदार्थ सॉफ्ट तर होतातच पण तेवढीच टॅंगी आणि क्रीमी टेक्शचर पदार्थाला येते.  हैद्राबादी बिर्यानी करताना त्यामध्ये गुलाब किंवा केवडा पाणीचा फ्लेवर किंवा टोमॅटो सुध्दा वापरत नाही. केरळ साईडला बिर्याणी मध्ये टमाटर वापरतात.  हैद्राबादी दम बिर्याणी मध्ये केशरचा वापर जास्त असतो. म्हणजे तिथल्या बिर्याणीचा तो स्टार आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये…
साहित्य घ्या मंडळीहो…

मटण मॅरीनेशन करण्यासाठी :-

 1. 1 किलो मटण
 2. 2 टेबलस्पून लसूण अदरक पेस्ट
 3. 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर
 4. 1/2 टेबलस्पून हळद
 5. चवीनुसार मीठ
 6. 300 ग्राम दही
 7. 25 ग्राम पुदिन्याचे पाने
 8. 50 ग्राम कोथिंबीर
 9. 2 टेबलस्पून बिर्याणी मसाला
 10. 2 ..3 तेजपाने
 11. 2 लंवग
 12. 3 ते ४ छोटी विलायची
 13. 2 मोठी विलायची
 14. 2-3 दालचिनी चे तुकडे
 15. 1 टिस्पून शहाजिरे
 16. 1/2 टिस्पुन लिंबू रस
 17. 2 …3 हिरवी मिरची
 18. 1 टेबलस्पून तूप
 19. 9 ..10 कांदे कापून तळलेले

भातासाठी :-

 • 700 …800 ग्राम बासमती तांदूळ
 • 1 ..2 दालचिनी स्टिक
 • 3 ..4 काळै मिरे
 • चवीनुसार मीठ
 • 2 तेजपाने
 • 3 ..4 लंवग
 • 1 टेबलस्पून तूप
 • 1/2 टेबलस्पून लिंबू रस

लेयर करण्यासाठी लागणारे साहित्य :-

 • 2 टेबलस्पून तुप
 • 3 …4 टेबलस्पून तेल
 • 1/2 कप केशरयुक्त दुध
 • 25 ग्राम कोथिंबीर
 • 10 ग्राम पुदिन्याचे पाने
 • तळलेला कांदा

हे साहित्य घेतले असेल तर लागा की बनवायला

प्रथम 9,10 कांद्याचे काप गोल्डन कलर येईपर्यंत करुन तळून घ्या. आता आपल्याला मटण मॅरीनेट करायचे आहे. त्यासाठी वरती मॅरीनेशन करण्यासाठी जे सामग्री सांगितली आहे ती क्रमाक्रमाने मटणात घाला. किमान 1,2 तास आपल्याला मटण मॅरीनेट करायचे आहे.

बासमती तांदूळ घेऊन तो 30 मिनिटे पाण्यामध्ये सोक करुन ठेवा. भात तयार करण्यासाठी एक मोठे पाॅट घ्या. त्या भांड्यात 10 ते 12 कप पाणी घाला. थोडे जास्त झाले तरी चालेल. त्यात चवीप्रमाणे मीठ घाला. बाकीचे मसाले घाला. जसे दालचिनी, मोठी विलायची, शहाजिरे, लंवग, मीरे, तेजपान, एक टेबलस्पून तुप, लिंबू रस घालून पाण्याला उकळी येऊ द्या. आता त्यात बासमती तांदूळ घाला. हा राईस 60-70 % शिजवून घ्यायचा आहे. एका चाळणीत भाताला टाकुन त्यातले पाणी चांगले निथळून घ्या.

बिर्याणीला दम देण्याची प्रोसेस लेयर करून… ज्या भांड्या मध्ये आपल्याला बिर्याणी करून घ्यायची आहे ते भांडे घ्या. आता मॅरीनेट केलेले अर्धे मटण त्यात घाला. सर्वाकडे निट पसरवून घ्या.. त्यावरती भाताची लेयर घालून तोही व्यवस्थित पसरवून घ्या. आता या भातावर तूम्हाला पुदिन्याचे पाने, कोथिंबीर, केशरयुक्त दूध, तळलेला कांदा, लिंबू रस, आणि सर्वात शेवटी 1 टेबलस्पून तूप घाला. नंतर परत एकदा मॅरीनेट केलेले मटण.. त्यावर भाताची लेयर आणि वरती जसी सामग्री घातली तशीच आता ही घाला.

आता झाकण लावून चांगले टाईट बंद करा. त्यासाठी झाकणाला कणकेची लोळी करुन ती लावा. कींवा झाकणावर एखादे वजन ठेवा जेणेकरून आपली वाफ बाहेर जाणार नाही.

गॅस चालू करुन गॅस वर लोखंडी तवा ठेवा. त्यावर आता बिर्याणीचे भांडे ठेवा.. 15 मिनिटे हाय फ्लेमर. नंतर फ्लेम कमी करुन 35 मिनिटे बिर्याणी होऊ द्या.
गॅस बंद करा. झाकणाला आजुबाजुला लावलेली कणीक निट काढून घ्या. झाकण उघडून एका साईडनी चमच्यांनी बिर्याणी काढा…
आणि सर्व्ह करा हैद्राबादी मटण दम बिर्याणी.. दही रायत्या सोबत

टीप :- जेव्हा आपण लेयरींग करतो. तेव्हा तुपासोबत तेल पण टाका. म्हणजे आपली बिर्याणी ड्राय होणार नाही.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here